पुणे : ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केल्याची घटना पुण्यात घडलीय. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकात हा प्रकार घडला. रविंद्र इंगळे आणि कैलास काळे हे दोघे कर्मचारी वाहतूक नियमनाचं काम करत होते.
सिग्नल तोडून निघालेल्या एका मोटारसायकलला त्यांनी अडवलं. त्यावरून मोटारसायकल चालक आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर मोटारसायकलचालकानं थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. इतकच नाही तर मोटारयकलवरील दोघांनी त्या पोलिसांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये एक महिलाही होती. तिथून जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचं रेकॉर्डींग झालंय.