देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरण, सर्व आरोपींचा जामीन फेटाळला

नाशिक जिल्हा न्यायालयानं फेटाळलेल्या या जामिनामुळे खळबळ उडालीय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 10, 2018, 12:53 AM IST
देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरण, सर्व आरोपींचा जामीन फेटाळला title=

नाशिक : कोलम्बिका देवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट प्रकरणात शेकडो एकर जमीन घोटाळा प्रकरणात बांधकाम व्यावसायिकासह तत्कालीन तहसीलदार तलाठ्यासह 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या जमीन घोटाळ्यात मंत्रालयातून घडामोडी घडल्याचा संशय आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये वाढत असलेल्या गैरव्यवहारांना महसूल अधिकारी, विश्वस्त संस्था निबंधक आणि पुरातत्व विभाग जबाबदार असल्याचे आरोप करत महंत उदयगिरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. 

त्र्यंबकेश्वरमधल्या 200 कोटींच्या कोलंबिका देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन फेटाळण्यात आलाय. नाशिक जिल्हा न्यायालयानं फेटाळलेल्या या जामिनामुळे खळबळ उडालीय. 

देवस्थानच्या विश्वस्तांसह 35 जणांचा समावेश

या आरोपींमध्ये दोन तहसीलदार, बांधकाम व्यावसायिक आणि कोलंबिका देवस्थानच्या विश्वस्तांसह 35 जणांचा समावेश आहे. या प्रकरणात म्हणणं मांडण्यासाठी शासनाला 3 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 

सर्वांचा जामीन फेटाळण्यात आला

शासनानं विरोधात भूमिका मांडल्यामुळे या सर्वांचा जामीन फेटाळण्यात आलाय. विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी हा दोन कोटींचा जमीन गैरव्यवहार उघडकीस आणला होता.