10 वर्षांची मुलगी व्हेंटिलेटरवर; कारण ठरलं शिक्षिकेचा मार

Tuition Teacher Slapped Child : अनेक लोकांना आजही वाटतं की, मुलांना शिस्त लावण्यासाठीस त्यांना फटके देणे गरजेचे आहे. या वाक्याला खरं ठरवणारा प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 24, 2024, 10:58 AM IST
10 वर्षांची मुलगी व्हेंटिलेटरवर; कारण ठरलं शिक्षिकेचा मार title=

ही बातमी वाचून संपूर्ण देश हादरला आहे. तसेच त्या चिमुकल्या 10 वर्षांच्या मुलीसाठी प्रार्थना करत आहे. महाराष्ट्रातील नालासोपारा, पालघर येथील 10 वर्षांची मुलगी व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आळं आहे. ती आता आपल्या आयुष्याशी झुंज देत आहे. 

या 10 वर्षांच्या मुलीला ट्युशन टिचरने दोनवेळा कानाखाली मारल्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली होती परंतु पीडित मुलीला आठवड्याभरानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोपर्यंत तिची प्रकृती ढासळू लागली होती.

एका 20 वर्षीय खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने मुलीला कानाखाली मारल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 10 वर्षांची मुलगी वर्गात गैरप्रकार करत होती, असे ट्यूशन टिचरचे म्हणणे आहे. ही कानाखाली इतकी जोरदार होती की, शिक्षिकेने घातलेली कानातली अंगठी तिच्या गालात अडकली. मेंदूला गंभीर दुखापत, जबड्याचा त्रास आणि टीटीचा संसर्ग झाल्यामुळे मुलीला के.जे. सोमय्या यांना मुंबई रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या 9 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सुरुवातीला ऐकू येणं बंद झालं... 

पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एका आठवड्यानंतर मुलीची प्रकृती खालावली आणि ती बेशुद्ध झाली. तेव्हा तिला हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खासगी शिकवणी शिक्षकाने (20) मुलीच्या कानावर जोरदार वार केले. यामुळे मुलीला सुरुवातीला बहिरेपणाचा त्रास झाला आणि लवकरच तिला आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. अल्पवयीन मुलीला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर मुंबईतील वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले.

मुलगी अद्याप बेशुद्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले असून तिच्या पालकांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी शिक्षकाला नोटीस बजावली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिक्षकेला अनावर झालेला राग चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे.