नाशिक : शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिकच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. अवघ्या नऊ महिन्यांतच ही बदली झाल्यानं राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांतही ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली. पण, नाशिकच्या आयुक्तपदानंतर मुंढेंची बदली नेमकी कुठे करण्यात आलीय, हे काही स्पष्ट होत नव्हतं... आता मात्र हे स्पष्ट झालंय. तुकाराम मुंढेंची सहसचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आलीय.
अधिक वाचा :- नाशिककर संतापले, पालिका प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी
नाशिक मगहानगरपालिकेचा कारभार हाताळणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाकडून बदलीचं पत्र हाती मिळालंय. 'शासनानं आपली बदली केली असून आपली नियुक्ती सह सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जिल्हाधिकार, नाशिक यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा' असा मजकूर या पत्रात दिसतोय.
अधिक वाचा :- तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत 11 वेळा बदल्या
उल्लेखनीय म्हणजे, २००५ साली प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या तुकाराम मुंढे यांची आत्तापर्यंत तब्बल ११ वेळा बदली करण्यात आलीय. मात्र, मुंढेंच्या या बदलीनंतर नाशिककरांनी संताप व्यक्त केलाय. या निर्णयाविरोधात नाशिकमधल्या नागरिकांनी महापालिका प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. तुकाराम मुंढे यांची बदली तातडीने रोखावी, अशी मागणी यावेळी करण्यात येतेय.