दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी कडकशिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने बदली केली आहे. मुंढे सध्या मुंबईत एडस् नियंत्रण सोसायटीच्या संचालकपदी होते. तिथून त्यांची बदली आता नागपूर महापालिकेत करण्यात आली आहे.
मुंढे जिथे जातील तिथे महापालिकेतील सत्ताधारी आणि मुंढे यांचा संघर्ष होतो. त्यामुळे भाजपाची सत्ता असलेल्या नागपुरात मुंढे यांची बदली करून भाजपावर कुरघोडी करण्याचा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. सध्या नागपूरच्या महापौरपदी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी आहेत. त्यामुळे हा देवेंद्र फडणवीस यांनाच शह देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.
मुंढे आधी नाशिक महानगरपालिकेत होते तर त्याआधी नवी मुंबई महापालिकेत होते तिथे सत्ताधारी नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरले होते.
यासोबतच शेखर गायकवाड साखर आयुक्तपदावरून पुणे महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर राव यांची बदली साखर आयुक्तपदी झाली आहे. तर संपदा मेहता विक्रीकर विभागात सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
१) अरविंद कुमार, आयएएस (१९८५), व्यवस्थापकीय संचालक, एमपीसीएल, मुंबई हे अतिरिक्त मुख्य सचिव (आरडीडी आणि जलसंधारण), ग्रामीण विकास व जलसंधारण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त
२)डी.टी.वाघमारे, आय.ए.एस. (१९९४), मुख्य सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, हे एम.एस.इलेक्ट्रिक ट्रान्समिशन कंपनी, मुंबई चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त
३) पराग जैन-नैनुत्तिया, आय.ए.एस. (१९९६), एम.एस.इलेक्ट्रिक ट्रान्समिशन कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव म्हणून नियुक्ती
४) रणजितसिंग देओल, आयएएस (१९९८), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबईचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त
५) आर. आर. जाधव, आय.ए.एस. (१९९८) आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई हे सचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय. मुंबई म्हणून नियुक्त
६) प्राजक्ता वर्मा, आय.ए.एस. (२००१), आयुक्त, उत्पादन शुल्क, मुंबई या मराठी भाषा विभाग, मुंबई सचिव म्हणून नियुक्त
७) एस.एन.गायकवाड, आय.ए.एस. (२००२), आयुक्त, साखर, पुणे हे पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त
८) ए.एम.कवडे, आय.ए.एस. (२००३), महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक, पुणे हे सहकार व निबंधक, सहकारी संस्था, पुणे येथे आयुक्त म्हणून नियुक्त
९) सौरभ राव, आय.ए.एस. (२००३), पुणे महानगरपालिका, आयुक्त हे आयुक्त साखर, पुणे म्हणून नियुक्त
१०) एस. एस. डुंबरे, आयएएस (२०००) अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग हे महासंचालक, एमईडीए, पुणे येथे नियुक्त
११) ओमप्रकाश देशमुख, आयएएस (२००)), एडीशन सेटलमेंट कमिशनर आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे हे पुणे महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक म्हणून नियुक्त
१२) एस. आर. जोंधळे, आयएएस (२०००) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई हे सचिव (एसडीसी) आणि एसईओ (२), जीएडी, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त
१३) के.बी. उमप, आय.ए.एस. (२००५), महासंचालक, एमईडीए, पुणे हे आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई म्हणून नियुक्त
१४) तुकाराम मुंढे, आय.ए.एस. (२००५), प्रकल्प संचालक, एम.एस.एड्स कंट्रोल सोसायटी, मुंबई हे नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त
१५) ए.ई.रायते, आय.ए.एस. (२००७) हे एडीशनल सेटलमेंट कमिशनर आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्त .
१६) संपदा मेहता, आयएएस (२००८), सह-आयुक्त, विक्री कर, मुंबई या पदावर नियुक्त
१८) आर.डी.निवाटकर, आय.ए.एस. (२०१०), सह-सचिव, मुख्य सचिव कार्यालय, जी.ए.डी., मंत्रालय, मुंबई या जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई म्हणून नियुक्त
१९) आयुष प्रसाद, आय.ए.एस. (२०१५), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथे नियुक्त
१९) यू.ए. जाधव, (अतिरिक्त जिल्हाधिकारी), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला म्हणून नियुक्त
२०) किरण पाटील, (मंत्रालय ), उपसचिव, कृषी व एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई हे उपसचिव, मुख्य सचिव कार्यालय, जी.ए.डी., मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त