सांगलीनंतर विरार पोलिसांनी घेतला २ भावांचा जीव

कोणाचा जाच होता या भावांना ? रक्षकच कसे भक्षक होतात. पाहा विरारमधील ही धक्कादायक बातमी.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 23, 2018, 12:13 AM IST
सांगलीनंतर विरार पोलिसांनी घेतला २ भावांचा जीव title=

प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई : न्यायासाठी दोन महिन्यात दोन भावांनी एकापाठोपाठ आत्महत्या केल्यात. आता वडीलांनीही आत्महत्येचा इशारा दिलाय. कोणाचा जाच होता या भावांना ? रक्षकच कसे भक्षक होतात. पाहा विरारमधील ही धक्कादायक बातमी.

भावांनी एकापाठोपाठ आपले जीवन संपवले

पोलीस एखाद्या प्रकरणाला कसे वळण लावू शकतात. याचे जिवंत उदाहरण विरारमध्ये पाहायला मिळाले. न्यायासाठी दोन महिन्यात दोन भावांनी एकापाठोपाठ आपले जीवन संपवले. यामुळे पालघर पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. 

पोलीसांची अरेरावी आणी मनमानी

धक्कादायक प्रकार म्हणजे २ भावांचा जीव जावुनही पोलिस आपल्याच सहका-यांना पाठीशी घालत आहेत. विरारच्या फूलपाडा परीसरात राहणारे अमित आणि विकास... हे दोघे भाऊ पोलीसांची अरेरावी आणी मनमानीला बळी पडले आहेत. 

खोटे गुन्हे दाखल करण्यात आघाडीवर

विकास झा या युवकाने पोलीस आणि स्थानिक नेता याच्या विरोधात एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करून वसई पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन केले होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत विकासवरच आत्महत्या आणि पोलीस अधिकार्यावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

अमित झा यानेही आपले जीवन संपवलं

याच गुन्ह्याच्या विरोधात विकासचे वडील विनयकांत झा आणि त्याचा मोठा भाऊ अमित झा हा पोलीस स्थानकाच्या चकरा मारत होता. पोलिसांकडून तपासात दिरंगाई आणि आरोपीला वाचवण्याचा व्यवहार पाहून अमित झा यानेही आपले जीवन संपण्याचा निर्णय घेतला. 

अर्नाळा येथे अमितने विष प्राशन केले.

20 जानेवारी रोजी संध्याकाळी  अर्नाळा येथे अमितने विष प्राशन केले.  दादर येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमित याने मृत्यूपूर्वी एक व्हिडीओ तयार करून पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

पोलिसांनी आमची दोन्ही मुले खाल्ली, पोलिसांनी आधीच कारवाई केली असती तर माझी दोन्ही मुले जिवंत असती, असा टाहो अमितच्या आईने फोडलाय. 

आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

दोन भावांच्या आत्महत्येने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आपली बाजू सावरण्यासाठी विकासने आरोप केलेल्या स्थानिक नेता मुनाफ बलोच याच्यावर आत्म्हत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तर पोलीस निरीक्षक युनिस शेख यांची तडकाफडकी बदली केली आहे.

अमित झा आत्महत्या प्रकरणात विरारमध्ये शांतता पूर्ण तणाव आहे. स्थानिक रहिवासी पोलिस आणि नेते मंडळीं विरोधात संताप व्यक्त करतायेत. रक्षकच जर भक्षक बनले तर न्याय तरी कोणाकडे मागणार ?