मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...

Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही.  कसं ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 22, 2024, 11:03 AM IST
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या... title=

Mumbai goa highway News In Marathi: कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. होळी असो किंवा गणेशोत्सासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. परिणामी या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीच्या समस्येला वारवारं सामोरे जावं लागत. मात्र आता मुंबई- गोवा मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून लवकरच दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे. 

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशावेळी कामानिमित्त शहरात राहणारे नागरिक मतदानासाठी आपआपल्या गावाकडे परत असतात.  याचपार्श्वभूमीवर निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांच्या प्रवासाची गैरसोय होय नये म्हणून भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कशेडी घाट ते बोगड्यातून पुन्हा वाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना कशेडीचे घाटातून अवघ्या 5 ते 7 मिनिटांत अंतर गाठता येणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांची वळणावळणाच्या कशेडी घाटादरम्यानचा प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी 441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कशेडी बोगदा तीन पदरी असून असे दोन बोगदे हाती घेण्यात आले. त्यातली एकेर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा हा 2 किलोमीटरचा असून एक तासाचे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार होणार आहे. 

तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली. मात्र मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी वाहतुकीस परवानगी असूनही कशेडी घाटात बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने मुंबईकरांना अजूनही कशेडी टॅपमार्गे खेडकडे रवाना व्हावे लागत आहे. 

चार वर्षापासूनची प्रतिक्षा संपणार

2019 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आता बोगद्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यातच डिसेंबर 2024 ची शेवटची डेडलाईन चौपदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे.