नवी मुंबईत दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या

 एक धक्कादायक घटना. दोन संख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली  आहे.  

Updated: Aug 3, 2021, 08:36 AM IST
नवी मुंबईत दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या

नवी मुंबई : एक धक्कादायक घटना. दोन संख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली  आहे. शरहरातील ऐरोली येथे राहत्या घरात दोन बहिणींनी गळफास लावून केली आत्महत्या केली. लक्ष्मी पंत्री  (33), आणि स्नेहा पंत्री (26) या दोघींनी हॉल आणि बेडरुममध्ये पंख्याला गळफास घेतला.  (Two Sisters Committed Suicide By Hanging at  Airoli in Navi Mumbai)

नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी संध्याकाळी समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या दोघी बहिणी सुशिक्षित असून लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या. 

दरम्यान, त्यांच्या वडिलांचे याआधीच निधन झाले होते. तर दहा वर्षांपूर्वी त्यांची आई सुध्दी गेली. आता या दोघींनीही आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.

दोन दिवस दरवाजा बंद असल्याने अचानक दुर्गंधी आल्याने आसपासच्या रहिवाश्यांनी दरवाजा ठोकला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून शेजारच्या लोकांनी माजी नगरसेवक विजय चौगुले यांना याबाबत माहिती दिली. यानंतर चौगुले यांनी घटनास्थळी खातरजमा केल्यावर पोलिसांना संपर्क साधला पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर आतमध्ये दोन तरुणीचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढलून आले,अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली.