आधी खुर्च्या उचलून फेकल्या मग धक्काबुक्की आणि मारहाणही...पंचायत समितीत काँग्रेस सदस्यांचा राडा

अरारा! औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस सदस्यांचा तुफान राडा, पाहा व्हिडीओ

Updated: Aug 2, 2021, 10:26 PM IST
आधी खुर्च्या उचलून फेकल्या मग धक्काबुक्की आणि मारहाणही...पंचायत समितीत काँग्रेस सदस्यांचा राडा

औरंगाबाद: नागपुरातील काँग्रेस विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांचा संघ मुख्यालयाजवळचा राडा झाल्याची घटना ताजी आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा काँग्रेसच्य सदस्यांनी राडा केला आहे.  औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेस सदस्यांनी जोरदार राडा केला आहे. उपसभापती आणि नुकताच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अर्जुन शेळके यांना काँग्रेस सदस्यांनी धक्काबुक्की तसच मारहाण केली. 

इतकच नाही तर खुर्च्यांची फेकफेकी करत तोडफोडही केली. शेळके यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं उपसभापती निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली आणि त्याच रागातून हा हल्ला केल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

औरंगाबादमध्ये आता या राड्यामुळे आणि शेळके यांच्या भाजप प्रवेशामुळे वातावरण तापलं आहे. शेळके यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उपसभापती निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

या सगळ्या घडामोडीनंतर संतापलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी अर्जून शेळके यांना बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी धक्काबुक्की देखील करण्यात आली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.