अफलातून फोटो : सांगा डाव्या की उजव्या बाजूचा झेब्रा पाहतोय समोर ?

वन्यजीव छायाचित्रकार सरोष लोधी (Wildlife  photographer Sarosh Lodhi) यांनी मसाई मारा येथे दोन झेब्रांचा एकत्र काढलेला अफलातून फोटो सध्या संपूर्ण जगात चर्चेत विषय.

Updated: Jul 17, 2020, 02:27 PM IST
अफलातून फोटो : सांगा डाव्या की उजव्या बाजूचा झेब्रा पाहतोय समोर ?   title=

अमर काणे / नागपूर : येथील वन्यजीव छायाचित्रकार सरोष लोधी (Wildlife  photographer Sarosh Lodhi)  मसाई मारा येथे दोन झेब्रांचा एकत्र काढलेला अफलातून फोटो सध्या संपूर्ण जगात चर्चेत विषय झाला आहे. या दोन झेब्रांपैकी नेमका डाव्या की  उजव्या  बाजूच्या झेब्रा समोर पाहतोय याबाबत प्रचंड उत्सुक्ता सर्वांमध्ये निर्माण होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

'वाईल्ड लाईफ' फोटोग्राफर सरोश लोधी यांनी डिसेंबर २०१८मध्ये मसाई मारा येथे दोन झेब्रांचा हा फोटो काढला होता. हा फोटो त्यांचे मित्र  भारतीय वन अधिकारी (आयएफएस) परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.त्यांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर संपूर्ण जगात चर्चेत आला. लोधी यांनी काढलेला या दोन झेब्रा यांच्या फोटामधील डाव्या की उजव्या बाजूच्या झेब्राचा चेहरा आहे. याबाबत भ्रम निर्माण होत आहे.

या अफलातून फोटोवरून लोधी यांनाही जगाच्या कानाकोपऱ्यातून दोन झेब्रा यांच्यापैकी कोणता झेब्राचा चेहरा समोर पाहत आहे असे विचारणा करणारे फोन आणि मेल येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत बरीच चर्चा सुरु आहे.