भाजप प्रवेशाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया

 खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे.  

Updated: Aug 23, 2019, 07:32 PM IST
भाजप प्रवेशाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया title=

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. विकासकामांसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

आपल्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली असेल तर ती चांगलीच आहे असा टोलाही त्यांनी लगावला. साताऱ्याचा विकास मुख्यमंत्र्यांनीच केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ आडवाआडवीच केल्याचा टोला, त्यांनी स्वपक्षीयातल्या विरोधकांना लगावला आहे. यावेळी त्यांनी रामराजे निंबाळकर आणि शिवेंद्रराजे भोसले यांचीही खिल्ली उडवली. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्याचे  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याआधी उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे बोलले जात होते.

शिवेंद्रराजे भोसले हे सत्तेसोबत गेले आहेत. सत्तेसोबत असल्यामुळे शिवेंद्रराजे हे सातऱ्यात आणखी मजबूत आणि सक्षम होतील, याची भीती आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले हे पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती सूत्रांची माहिती आहे.