...म्हणून उदयनराजे भोसले कॉलर उडवतात!

जे सामान्य लोकांचं काम करतात तेच कॉलर उडवू शकतात

Updated: Jun 3, 2018, 08:11 PM IST

बीड : जे सामान्य लोकांचं काम करतात तेच कॉलर उडवू शकतात, असं दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला सांगितलं होतं. त्यांच्यामुळेच आपण कॉलर उडवतो असं सांगत, खासदार उदयनराजे भोसले यांनी बीडमधल्या भर कार्यक्रमात कॉलर उडवली. गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजे आपल्या भावना व्यक्त करताना भावूकही झाले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, मुख्यमंत्री, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.