Maharastra Politcs: शिंदेंच्या होमपिचवर ठाकरेंचा एल्गार, दौऱ्याचे राजकीय परिणाम काय होणार?

Uddhav Thackeray VS Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. काय काय झालं ठाकरेंच्या दौऱ्यात? आणि या दौऱ्याचे राजकीय परिणाम कसे असतील. पाहुयात...

Updated: Jan 26, 2023, 10:22 PM IST
Maharastra Politcs: शिंदेंच्या होमपिचवर ठाकरेंचा एल्गार, दौऱ्याचे राजकीय परिणाम काय होणार? title=
Uddhav Thackeray Eknath Shinde

Uddhav Thackeray Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) धडक दिली. खुद्द उद्धव ठाकरेच ठाण्यात (Thane News) धडकणार म्हटल्यावर ठाकरे गटानंही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ठाणे (Uddhav Thackeray In Thane) दौरा होता. विशेष म्हणजे आनंद दिघेंच्या (Anand Dighe) जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाकरेंनी ठाणे दौरा केला. आनंद दिघेंच्या समाधीचंही ठाकरेंनी दर्शन घेतलं. त्यापूर्वी शिंदेंच्या होमपिचवरुन ठाकरेंनी ठाण्यात मोठी सभा घेण्याची गर्जना केली. (Uddhav Thackeray group show of strength in CM Eknath Shinde's Thane tour, What will be the political impact)

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर तब्बल 7 महिन्यांनी उद्धव ठाकरे ठाण्यात आले. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. आपल्या छोटेखानी दौऱ्यात त्यांनी आरोग्य शिबिराचं उद्घाटन आणि जैन मंदिराला भेट दिली. जैन मुनींशी अर्धातास ठाकरेंनी संवाद साधला. याआधी नवरात्रौत्सवाच्या काळात रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) ठाण्यात येऊन आनंद दिघेंच्या दुर्गादेवीचं दर्शन घेतलं होतं. आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

शिवसेना आणि ठाण्याचं नातं -

शिवसेनेच्या (Shivsena) स्थापनेनंतर 1970 च्या आसपास ठाणे नगरपालिकेत पहिल्यांदा शिवसेनेला सत्ता मिळाली होती. शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना अशी घोषणा त्यावेळी दुमदुमली होती. 1974 मध्ये सतीश प्रधान थेट नगराध्यक्षपदी निवडून आले. ठाण्यात महापालिका (Thane Municipal Corporation) झाल्यानंतर सतीश प्रधान पहिले महापौर झाले. 1997 पासून गेली  25 वर्षं ठाणे महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे.

आणखी वाचा- Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे ठाण्यात आले पण 'आनंद आश्रमा'त नाही गेले; कारण...

ठाकरेंच्या दौऱ्याचे परिणाम काय होणार?

शिवसेनेला सत्ता मिळवून देणारं ठाणं पुन्हा एकदा काबीज करण्याची व्यूहरचना ठाकरे गटानं आखली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरलेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वत:चा किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतील. त्याला काऊंटर उत्तर देण्यासाठी ठाकरेंच्या सोबत दिसलेले जितेंद्र आव्हाड यांचा रोल महत्त्वाचा ठरू शकतो. एकीकडे शिंदे ठाण्यात व्यस्थ झाले तर काहीच्या खिंडीत शिंदे गटाचं (Shinde Group) पानिपत करण्याची रणनीती आणखी जात नाहीये का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. आता ठाकरेंनी हाती घेतलेली ही मोहीम किती फत्ते होते, हे येणारा काळच ठरवेल...