रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांच्या बहिण कीर्ती पाठक(Kirti Pathak) यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेय. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला(criticizes on BJP and Shinde group). सांगलीत(Sangali) त्या बोलत होत्या.
भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती केली गेली असून काही अंतराने त्यातील एक जण भुंकतो. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो आणि त्याच रिमोट दिल्लीत आहे. मुळात हे सर्व स्क्रिप्टेड असत अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली.
स्वाभिमान या शब्दाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूर पर्यंत संबध नाही. गद्दार हा शब्द त्यांच्या कपाळावर कायमचाच बसलेला आहे, अशी टीका ही पाठक यांनी केली. राज्यपाल यांनी तर कहरच केला आहे. महाराष्ट्राचा इतिहास माहित नसलेल्या राज्यपालांना राज्यातून हाकलून दिले पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी एका मध्यस्थीचा देखावा केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी जत, सोलापूर आणि अक्कलकोट मधील गावांवर दावा केला आहे. हे स्क्रिप्टेड असून दिल्लीतील नेत्यांनी त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली होती. बोमय्या यांना मागणी करायला लावायचं आणि परत मध्यस्थी करण्याचा देखावा करायचा प्रयत्न भाजपच्या दिल्लीमधील नेत्यांनी केला आहे. कोणीच कोणाच्या गावांवर दावा करायचा नाही. आता जे सांगितलं जात आहे ते म्हणजे जनतेला वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जनता वेडी बनणार नाही जनतेला सर्व काही माहित आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या आत्ता म्हणतात की ट्विटर हँडल माझं नाही. मात्र, त्यापेक्षाही तुम्ही महाराष्ट्रातल्या बसेस आणि गाड्यांची तोडफोड केली. महाराष्ट्रातील मंत्र्यांना येऊ दिलं नाही ही तुमची कृती सगळ्यांच्या समोर आलेली आहे. या कृतीचा आणि ट्विटर हँडलशी संबंध काय असा सवाल किर्ती पाठक यांनी उपस्थित केला. विषय बदलायचे आणि जनतेला वेड्यात काढायचं हा धंदा थांबवा. जनता तुम्ही समजता एवढी दूध खुळी नाही, असा टोला ही कीर्ती पाठक यांनी लगावला. कीर्ती पाठक या चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस आणि उद्धव ठाकरे यांच्या आतेबहिण आहेत.