Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदही जाणार? एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख होणार?

शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची शिवसेना प्रमुख अशी ओळख निर्माण झाली. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या खांद्यावर  कशी आली शिवसेना पक्ष प्रमुख पदाची जबाबदारी. आता पहिल्यांदा ठाकरे घराण्याच्या बाहेरील व्यक्ती अर्थात एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष प्रमुख होण्याची शक्यता आहे (Shiv Sena Crisis).  

Updated: Feb 21, 2023, 07:38 PM IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदही जाणार? एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख होणार?  title=

Uddhav Thackeray and Shiv Sena Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून गेले आहे.  शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेनेतील महत्वाच्या पदांवर देखील शिंदे गटाकडून दावा करण्यात येत आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे शिवसेना प्रमुख  हे पद देखील जाणार आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नवे पक्षप्रमुख होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे (Maharashtra Politics News). 

असा सुरु झाला ठाकरे आणि शिंदे यांच्यातील सत्ता संघर्ष

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात केलेल्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेवून एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले.  यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार रातोरात कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेतून ( Political News) बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. जून 2022 मध्ये हे राजकीय महानाट्य घडले. यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरु झाला.  शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरु होता. अखेरीस शिंदे गटाला शिवसेना पक्षाचा ताबा मिळाला आहे. 

शिंदे गट आता थेट शिवसेना प्रमुख पदावर दावा करणार

शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेनेतील महत्वाच्या पदांवर देखील शिंदे गटाकडून दावा करण्यात येत आहे.  शिंदे गटाकडून तशा प्रकारच्या हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. औरंगाबादचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आहेत. ते ठाकरे गटाचे आहेत.  शिंदे गटाकडून शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी विधानपरिषद सभागृह गटनेते म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे मुख्यनेते पद काढून घेतले जाणार आहे. यानंतर शिंदे गट आता थेट शिवसेना प्रमुख पदावर दावा करणार आहे.  एकनाथ शिंदे होणार शिवसेनेचे नवे पक्षप्रमुख होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र झाल्यास राष्ट्रीय कार्यकारिणीत शिंदे गट याबाबत निर्णय घेणार आहे. एकूणच उद्धव ठाकरेंना आणखी धक्के देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरु आहे. 

शिंदे गटाने शिवसेना प्रमुख पदाबाबत केला होता खळबळजनक दावा

उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक दावा शिंदे गटाने सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान केला होता. शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रित होती. पण,  नंतर ती बदलत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा खोटारडेपणा आहे. हे बदल बेकायदेशीर आहेत. त्यामुळे  उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत असं असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला होता. 

शिवसेनेचा इतिहास

19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. या मेळाव्यानंतर  बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना प्रमुख अशी ओळख निर्माण झाली.  2003 साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर काहीच दिवसात नारायण राणे यांनी त्यांच्या पाठोपाठ  राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला.17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. यानंतर पक्षाची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आली. यानंतरच उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून काम करु लागले.