एलिएन्स कोल्हापुरात उतरण्याच्या तयारीत?

व्हिडीओमध्ये एक तबकडी (UFO) कोल्हापूरच्या आकाश उडत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं पुन्हा एकदा एलिएन्सची ( alliance ) थेअरी मांडली जात आहे

Updated: Jun 2, 2022, 02:56 PM IST
एलिएन्स कोल्हापुरात उतरण्याच्या तयारीत?  title=

प्रताप नाईक, झी २४ तास कोल्हापूर: एप्रिल महिन्यात सूंपूर्ण उत्तर महाराष्ट्राने (North Maharashtra) आणि विदर्भाने (Vidharbha) आकाशातून कोसळणाऱ्या फायर बॉलचा थरार पाहिला. सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकानं वेगवेगळे तर्क मांडले. कुणी म्हणालं हे एलिएन्स म्हणजे परग्रहवासीयांचा हल्ला आहे. तर कुणी म्हणालं एलिएन्सचं विमान कोसळलं. ही घटना ताजी असताना एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तबकडी (UFO) कोल्हापूरच्या आकाश उडत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं पुन्हा एकदा एलिएन्सची ( alliance )  थेअरी मांडली जात आहे. 

कोल्हापुरात कुठे दिसली तबकडी सदृश्य वस्तू? 

पन्हाळा गडावरील अवकाशात पांढरी शुभ्र तबकडी सदृश्य वस्तू जातना दिसली. ही वस्तू स्थानिक रहिवासी रमेश पाटील,  दीपक दळवी, अस्मिता पाटील , मालती पाटील, सीमा माळी आणि विजय यांनी ही वस्तू अवकाशात पाहिल्याचा दावा केलाय. ही तबकडी तब्बल दोन तास अवकाशात अगदी धिम्या गतीने पुढे सरकत होती. ही तबकडी सदृश्य वस्तू पन्हाळा गडाच्या पश्चिमेकडून उत्तरेकडे पुढे सरकत होती. त्यानंतर ही दिसेनाशी झाली. या संपूर्ण घटनेचं चित्रण रमेश पाटील यांनी मोबाईलमध्ये केली आहे. 

तबकडीचं गूढ कायम?

विमान अकाशातून जात असल्यास ते विमान असल्याचं लगेच लक्षात येतं. मात्र पन्हाळ्याच्या अवकाशात दिसणारी या वस्तूने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. 
ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे. तो ही वस्तू नेमकी काय आहे. अवकाशात दिसणारी पांढरी शुभ्र वस्तूची शाहनिशा अवकाश संशोधन केंद्राने करावी अशी मागणी देखील होतेय. जेणेकरुन या कथित तबकडीच्या रहस्यावरुन पडदा उठेल