रत्नागिरी : स्थानिकांचा विरोध असल्यामुळे नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे आणि हिच शिवसेनेची भूमिका असल्याची प्रतिक्रिया अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिलीय.
मात्र, वैयक्तिक विचाराल तर आपण विकासाच्या बाजूने असल्याचं मत गीते यांनी गुहागरमध्ये जाहीर केलयं.
त्यामुळे गीते या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय.
तर तिकडे नाणार रिफायनरी प्रल्कल्पविरोधी बैठकीत एका व्यक्तीला ग्रामस्थांकडून चोप देण्यात आला आहे.
कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती मुंबई यांनी राजापूरच्या कुंभवडे हायस्कूलमध्ये ही बैठक आयोजीत केली होती. दरम्यान चोप मिळालेला व्यक्ती दलाल असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय.
यावेळी त्या व्यक्तीविरुद्ध दादागिरीचा प्रयत्न करण्यात आला असाही आरोप करण्यात येतोय.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध मात्र, आपण विकासाच्या बाजूने - अनंत गिते