केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गिते यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोली- पाली मार्गावर अपघात झाला. या अपघात गिते यांच्या डोक्याला मार बसलाय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 22, 2017, 04:12 PM IST
केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गिते यांच्या गाडीला अपघात title=

खोपोली : केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोली- पाली मार्गावर अपघात झाला. या अपघात गिते यांच्या डोक्याला मार बसलाय. त्यांना तात्काळ येथील शासकीय विश्रामगृहावर हलविण्यात आले. त्यांनी तेथे काही काळ विश्रांती घेतली.

दुचाकी स्वार आडवा आल्याने...

खोपोलीकडून पालीकडे जाताना पाली जवळ घडला अपघात. गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीला दुचाकी स्वार आडवा आल्याने अचानक पुढच्या गाडीने ब्रेक लावल्याने गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हँनने धडक  दिल्याने हा अपघात झाला.

गिते यांची गाडी दोन गाड्यांच्या मध्ये चेपली

मंत्री अनंत गिते हे आज रायगड दौऱ्यावर आले होते. ते पालीकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील पुढच्या पायलट गाडीने अचनाक ब्रेक दाबला. त्यामुळे ज्या गाडीत मंत्री गिते होते, त्या गाडीची धडक पुढच्या गाडीला बसली. तसेच मागून येणारी पायलट गाडीही गिते असणाऱ्या गाडीवर आदळली. गिते यांची गाडी दोन गाड्यांच्या मध्ये चेपली गेल्याने हा अपघात झाला.

गिते यांना किरकोळ दुखापत

या अपघातात गिते यांच्या डोक्याला मार बसला. त्यांना किरकोळ दुखापत झाली. गिते आता सुरखरुप असल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ पाली येथील विश्रामगृहावर हलविण्यात आले. तेथे त्यांना थांबविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले.