रायगड : जेएनपीटीने ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर जेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडू, असा इशारा उरणमधील ग्रामस्थांनी दिलाय.
उरणमधील जेएनपीटीतील सुरू झालेल्या चौथ्या सिंगापूर बंदरामध्ये स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य मिळावे. तसेच केंद्र सरकारचे डीपीडी धोरण रद्द व्हावे, यासाठी उरण परिसरातील ग्रामस्थांनी जेएनपीटीवर मोर्चा काढला. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.
गावागावांमध्ये नोकरी व रोजगार बचाव समितीने बैठका घेऊन जनजागृती केली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या मोर्चात सामील झाले होते. मनसे नेते बाळा नांदगावकर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, शेकापचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार भाई जगताप आदी विविध पक्षाचे नेते उपस्थित होते.