ख्यातनाम धृपद गायक उस्ताद सइदउद्दीन डागर यांचं निधन

ख्यातनाम धृपद गायक उस्ताद सइदउद्दीन डागर यांचे रविवारी पुण्यात निधन झाले.

Updated: Jul 31, 2017, 05:14 PM IST
ख्यातनाम धृपद गायक उस्ताद सइदउद्दीन डागर यांचं निधन title=

पुणे : ख्यातनाम धृपद गायक उस्ताद सइदउद्दीन डागर यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर आज जयपुर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

ध्रुपद गायकीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झकीरउद्दीन डागर यांचे ते नातू होते. साधारण सहा दशकं त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची अविरत सेवा केली. स्वातंत्र्योत्तर काळात कलांना मिळणारा राजश्रय निघून गेला. त्यामुळे अनेक कलाप्रकार नष्ट होण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागले. ध्रुपद गायकीची परंपरा जपण्यात डागर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. त्याच परंपरेत सईदद्दुीन डागर यांनीही ध्रुपद गायकीसाठी आपलं आय़ुष्य वेचलं.