राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात

ज्यात उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या (Vaccination of citizens above 18 years) लसीकरणाला  (Vaccination in Maharashtra) सुरुवात होणार आहे.

Updated: Jun 21, 2021, 10:24 PM IST
राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात

मुंबई : राज्यात उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या (Vaccination of citizens above 18 years) लसीकरणाला  (Vaccination in Maharashtra) सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यात कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाययोजना याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आढावा घेतला. 

राज्यात कालपर्यंत 30  ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरापासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की, आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवतीपासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणे आता शक्य आहे.

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातील कुठल्या सुविधा भविष्यात कायम स्वरुपी ठेवता येतील आणि कोणत्या सेवांचे श्रेणीवर्धन करता येईल, याचा आराखडा तयार करावा. आरोग्य संस्थांची जी बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात त्याची कालबद्धता आणि जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेत.

तसेच आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांच्या निर्माण व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात यावा. उभारलेल्या आरोग्य सुविधा चालवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च याकडेही लक्ष दिले जावे. नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देतानाच पदांनाही मंजुरी दिल्यास कालापव्यय टाळता येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.