Ajit Pawar on Lumpy Virus : कोरोना, मंकीपॉक्समधून आता कुठे सावरलो नाहीतर आता लम्पी व्हायरसने टेन्शन वाढवलं आहे. बळीराजाच्या गुरांना याचा मोठा फटका बसत आहे. दुभती जनावरांनी दुध देणं बंद झाली आहेत तर जनावरे पाणी पित आहेत नाही चारा खात आहेत. देशभर या व्हायरसने मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे जनावरांच्या लसीकरणासाठी मागणी केली आहे.
लम्पी व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे. 10 लाख लसी आपल्याला आल्या आहेत मात्र ह्या लसी कमी आहेत. जर 2000 लसी तयार करणाऱ्या कंपन्या असतील तर माझं सरकारला स्पष्ट सांगणं आहे की, परदेशातून लसी मागवा पण माझ्या शेतकऱ्याचं जनावर जगलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लम्पी व्हायरसची लागण जनावरांना झाली नाही पाहिजे याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बैल, गायींना आणि चार वर्षापेक्षा लहान असणाऱ्या खोंडांना लसीकरण झालं पाहिजे. मला मिळालेल्या माहितीनुसार, एखाद्या गावामध्ये जनावराला लम्पी व्हायरस झाला तर त्या गावाच्या 5 किमीच्या भागातील सर्व जनावरांचं लसीकरण करण्याचं धोरण केंद्र सरकारने ठरवल्याची माहिती असल्याचं पवार म्हणाले.
लम्पी व्हायरसची लक्षणे :
दुभती गाय म्हैस असेल तर दूध देणं बंद करते.
अंगात ताप वाढतो
पशु चारा खात नाहीत. (भूक मरते) पाणी पीत नाहीत.
नाकातून आणि डोळ्यातुन पाणी येते
डोळे मान आणि कास या ठिकाणी 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
तोंड खराब होते
डोळ्याला चिपडे येऊन दृष्टी बाधित होते
पायाला सूज येवून जनावर लंगडी होतात,प्रसंगी मृत्यू होतो.
उपाय :
गाईंना मच्छर व गोमाशी यांच्यापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून निमतेल व लाईफबाॅय साबन एकत्र करुन फवारणी करावी
कडुलिंबाच्या झाडाच्या हिरव्या पाल्यापासून धुर करून मच्छर आणि गोमाशी पळवण्याचा प्रयत्न करावा
शक्यतो गोठ्यात चिखल किंवा घाण होणार नाही याची काळजी घ्या.गोठा म्हणजे पशुंची जागा स्वच्छ ठेवावी.
लक्षणे दिसुन आली तर तात्काळ पशु वैद्यकीय अधिकारी यांना कळवून योग्य ते उपचार सुरु करा.