Superfast travel : महाराष्ट्रात आता पहिली सेमी हायस्पीड रेल्वे या मार्गावर धावणार

Superfast travel : महाराष्ट्राला आता पहिली वंदे भारत ही सेमी हायस्पीड रेल्वे (Vande Bharat semi high speed train) मिळणार आहे. मुंबई - पुणे या मार्गावर वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे.  

Updated: Jun 3, 2022, 10:48 AM IST
Superfast travel : महाराष्ट्रात आता पहिली सेमी हायस्पीड रेल्वे या मार्गावर धावणार title=

मुंबई : Superfast travel : महाराष्ट्राला आता पहिली वंदे भारत ही सेमी हायस्पीड रेल्वे (Vande Bharat semi high speed train) मिळणार आहे. मुंबई - पुणे या मार्गावर वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. (Vande Bharat Semi High Speed Train will run on Mumbai-Pune route) वंदे भारत ट्रेन अवघ्या अडीच तासांत मुंबई पुणे अंतर पार करेल. 

या मार्गावर दोन वंदेभारत गाड्या येणार आहेत. अजून तारीख निश्चित झालेली नाही. पण 15 ऑगस्टपर्यंत ही गाडी या मार्गावर धावेल अशी शक्यता आहे. सध्या या मार्गावर डेक्कन क्विन ही सर्वाधिक जलद गाडी आहे.

डेक्कन क्विन पुणे मुंबई अंतर तीन तास दहा मिनिटांत पार करते. याशिवाय लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसला एसी स्लिपर क्लासही लावला जाईल. ही एसी स्लिपर क्लास असलेली वंदे भारत 2023 मध्ये दाखल होईल. ती गाडी सीएसएमटी ते फिरोजपूर या मार्गावर धावणार आहे.