वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी... भगवान गडावर आज मेळावा

महंत शास्त्री विरुद्ध मुंडे वाद पेटणार?

Updated: Aug 31, 2018, 08:56 AM IST
वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी... भगवान गडावर आज मेळावा  title=

बीड : वंजारी समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी नुकतीच जोर धरू लागलीय. या संदर्भात आज पंकजा मुंडे समर्थक फुलचंद कराड, यांच्या उपस्थितीत भगवानगडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. आजच संत भगवानबाबा यांची १२२ वी जयंती भगवान गडावर साजरी केली जाणार आहे. या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक गडावर येत असतात.

दरम्यान, फुलचंद कराड हे पंकजा मुंडे समर्थक असून हा मेळावा रद्द करावा, अशी मागणी नामदेव शास्त्री यांनी तहसीलदारांकडे केलीय. त्यामुळं भगवान गडावरून पुन्हा एकदा, महंत शास्त्री विरुद्ध मुंडे असा वाद निर्माण झालाय.