डर के आगे जित हैं... एका जोडप्याच्या कामगिरीनं जिंकली लाखोंची मनं

Vasai News: शिक्षणाला कसलीच मर्यादा नसते. आपण शिक्षण कोणत्याही (vasai news) वयात घेऊ शकतो. त्याला काही वयाचं बंधन नाही. म्हातारपणीही लोकं मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्चशिक्षण यशस्वीपणे (higher education) घेतलं आहे.

Updated: Dec 7, 2022, 06:53 PM IST
डर के आगे जित हैं... एका जोडप्याच्या कामगिरीनं जिंकली लाखोंची मनं  title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई: शिक्षणाला कसलीच मर्यादा नसते. आपण शिक्षण कोणत्याही (vasai news) वयात घेऊ शकतो. त्याला काही वयाचं बंधन नाही. म्हातारपणीही लोकं मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्चशिक्षण यशस्वीपणे (higher education) घेतलं आहे. त्यामुळे सध्या अशा प्रकारे यशस्वीपणे शिक्षण क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या लोकांचा गौरव करावा तेवढाच कमी आहे. सध्या अशाच एका बातमीनं तुम्हालाही (education news) अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. संसार हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आपण आयुष्यभर झटत असतो. (vasai news a couple passes gdc and a exam togther and becomes accountant)

संसारातून आपल्याला कधी दुसऱ्या कुठल्या कामासाठी वेळ मिळेल अशी आपण अपेक्षाही अनेकदा करत नाही. आपल्या संसारासाठी अनेक गोष्टींचा त्यागही करतो परंतु समोर (marriage life) आलेल्या बातमीतून हेच समोर येते की संसारतूनही मार्ग काढत या जोडप्यांनी शिक्षणात मोठं यश प्राप्त केलं आहे. संसाराच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या वसईतील एका घराण्यातील पती पत्नीने यशाच्या सप्तपदीला गवसणी घालत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या जीडीसी अँड ए -2022 च्या (GDC and A) परीक्षेमध्ये दोघांनी सुयश प्राप्त केले आहे. मे 2022 मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल 1 डिसेंबर 2022 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला.

कोण आहे हे जोडपं? 

राज्य शासनाच्या सहकार विभागाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत वसईतील उच्चशिक्षित असे मनीष अरुण राणे (40 ) व सौ.पल्लवी मनीष राणे (35) या पती पत्नी दाम्पत्याचे (accountant) नाव एकाचवेळी पहिल्याच प्रयत्नात झळकले असल्याने संबंध वसई व पालघर जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. अवघ्या 35 व 40 व्या वर्षी यशाची चढती कमान गाठण्यासाठी विवाहानंतर दहा वर्षांनी हे दोघे पुन्हा परीक्षेला सामोरे गेले. त्यामुळे शिक्षणाला व शिकायला वयाची अट कधी ही नसते हे पुन्हा एकदा सिध्द झाले तर अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर दोघांनी हे यश संपादन केल्याने आजच्या तरुण पिढीला हे उदाहरण आहे. 

ध्येय समोर असेल तर आपण यश खेचून आणून शकतो. राणे दापत्यांप्रमाणे अमरावतीची अंकिता पाचंगे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमध्ये पहिली आली आहे. मनात काही करण्याची इच्छा आणि जिद्द असली तर माणूस खडतर मार्गातूनही राजमार्ग निर्माण करतो. परिस्थिती वर मात करत मेहनत करत विद्यार्थी यशाचे शिखर गाठत असतात. अशाच प्रकारे अमरावती मधील अंकिता पाचंगे या विद्यार्थीनीने अथक प्रयत्न करत महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची परीक्षा (MPSC) देत तांत्रिक सहायक पदी महाराष्ट्रतून मुलीमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला विशेष म्हणजे पाहिल्याचं प्रयत्नत अंकिता ही उत्तीर्ण झाली आहे.

प्रतिकुल परिस्थितीत तिने मुलींमध्ये राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवल्याने अंकिताने शिक्षणाच माहेरघर असलेल्या अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अंकिता पाचंगे हीने अभ्यासात सातत्य ठेऊन हे यश मिळवले आहे. अवघे बीएस्सी शिकलेल्या अंकिताने राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या या परीक्षेतही ती पहिल्याच प्रयत्न मध्ये उत्तीर्ण झाली आहे हे विशेष. अभ्यास करताना हार्ड वर्क केल्या पेक्षा स्मार्ट वर्क (smart work) केलं पाहिजे असं ती सांगते. कोरोना काळात ग्रंथालय बंद असल्याने तिने आपल्या अभ्यासाची जिद्द सोडली नाही घरी सातत्याने तिने अभ्यास करत आयोगाच्या परीक्षेची तयारीं केली त्यातूनच तिला हे यश मिळाले आहे.