Crime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये

व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला खूश करण्याच्या नादात हा तरुण थेट जेलमध्ये गेला आहे. 

Updated: Feb 13, 2023, 08:26 PM IST
Crime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये  title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे  व्हेलेंटाईन डे (valentine day 2023). या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना भेटवस्तु देऊन आपल्या प्रेम भावना व्यक्त करतात. मात्र, तरुणांमध्ये व्हेलेंटाईन डे चं वेगळचं फॅड पहायला मिळत आहे. आपल्या पार्टरनला महागडे गिफ्ट देतात.  व्हेलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी एका तरुणाने चुकीचा मार्ग निवडला. विरारच्या माणिकपूर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे (Crime News).  

वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. याच्याकडून चोरलेल्या पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान चोरी करण्यामागे याने सांगितलेले कारण ऐकून पोलिसही शॉक झाले आहेत.
चंद्रेश पाठक असं यां आरोपीचे नाव आहे. चंद्रेश हा मुंबईच्या दहिसर परिसरात राहणारा आहे. वसईच्या नायगाव परिसरातून एक इलेक्ट्रिक मोटारसायकल चोरी झाली होती याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सिसिटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

आरोपी  चंद्रेशकडे केलेल्या कसून चौकशीत त्याकडून चोरलेल्या पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नुकतेच त्याने चोरलेल्या मोटारसायकलच्या मिळणाऱ्या पैशातून तो गर्लफ्रेंडला व्हलेनटाईन गिफ्ट देणारं होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याआधीच पोलिसांनी चंद्रेशला ताब्यात घेतले आहे. यामुळे आता चंद्रेशचे  व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन जेलमध्येच होणार आहे. 

 7 फ्रेबुवारीपासून व्हॅलेन्टाईन वीक (valentine week 2023) सुरु झाला आहे. Rose Day, Propose Day,  Chocolate Day, Teddy Day,  Promise Day, Hug Day,  Kiss Day  नंतर  Valentine's Day साजरा केला जाणार आहे. 

14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारा

व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस गायीला मिठी मारुन साजरा करण्याचं आवाहन भारतीय प्राणी कल्याण मंडळानं केले आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे प्राचीन वैदिक परंपरा दुर्लक्षित होत आहे. म्हणून 14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारुन वैदिक परंपरेचं पालन करुया असं मंडळाच म्हणण आहे. गाईला मिठी मारल्याने भावनिक संपन्नतेचा अनुभव घेता येईल असा दावाही मंडळाने केला आहे.