Gautami Patil Viral Video : आपल्या अदाकारीने सगळ्यांना घायाळ करणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil Dance Video) एक खासगी व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतलीय. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना दिलेत आहेत. कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज प्रथमच गौतमी पाटीने मौन सोडले आहे. या सर्व प्रकरणार गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. मात्र, त्याबाबत आपण अधिक काही बोलू शकत नाही, असं गौतमी पाटील म्हणाली. राज्य महिला आयोगाच्या कारवाईचे गौतमीने स्वागत केले आहे. महिला आयोगानं कारवाईचे आदेश दिलेत, बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील हिनी दिली. नाशिकमध्ये गौतमीच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गौतमी व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
गौतमीच्या एका स्टेज शोच्या वेळचा हा व्हिडिओ आहे. स्टेजशोच्या वेळी गौतमी कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आला. हा व्हडिओ फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला होता. हा व्हडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या सर्व प्रकारानंतर पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाला होता. खेड तालुक्यातल्या गुंडाळवाडीत यात्रोत्सवात गौतमीचा कार्यक्रम आयोजित केलेला. मात्र, स्टेजपुढे तरुणांनी धुडगुस घातला. कार्यक्रम थांबवल्यावर तरुणांनी पुन्हा गाणी लावण्यासाठी धुडगुस घातला. अखेर राजगुरू नगर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. मात्र या गोंधळामुळे आयोजकांना कार्यक्रम संपल्याचं जाहीर करावं लागलं.
अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. गौतमी तिच्या डान्सचे छोटे छोट्या क्लिप सोशल मीडियावर देखील शेअर करत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी देखील यावरुन गौतमीची कानउघाडणी केली होती. अश्लिल हावभावांमुळे गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रविकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.