Uddhav Thackeray : येथील शिवगर्जना मेळाव्यात हिंगोलीचे (Hingoli) ) खासदार संजय जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जाधव (sanjay jadhav) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच घरचा आहेर दिला आहे. ठाकरेंनी पोराला मंत्री करायला नको होतं. आणि पोराला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं, असं मत जाधवांनी भरसभेत व्यक्त केलं. ठाकरेंमुळंच चोरांना संधी मिळाली, असा टोलाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता शिंदे गटाला लगावला.
शिंदेंनी पक्षात गद्दारी का झाली? एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष का फोडला यावर भाष्य करताना थेट उद्दव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंत्रीपदाच्या दोन खुर्च्या अडल्यागेल्यामुळे बाप गेला तरी पोरगा माझ्या डोक्यावर बसणारच असे एकनाथ शिंदे यांना वाटले यामुळेच त्यांनी बंड केले. दोघेही मंत्री झाल्यामुळे उद्धवसाहेबांचे दुर्लक्ष झाले, त्यांना लक्ष देता आले नाही, त्यामुळेच चाळीस चोरांना संधी मिळाली असेही जाधव म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेले नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतरही त्यांनी गद्दारी केली. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कोणत्याच मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसऱ्या कुणाला दिले नव्हते, ते तुम्हाला दिले तरी तुम्ही गद्दारी केली, अशी टीका देखील जाधव यांनी यावेळी केली.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन करून मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तासच्या ब्लॅक अँड व्हाईट या खास कार्यक्रमातल्या मुलाखतीत केला. फडणवीसांनी त्यावेळच्या घडामोडींबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.