close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ : ...आणि गोविंदा नवव्या थरावरून खाली कोसळला

'जय जवान'नं दोनदा प्रयत्न करूनही त्यांना नऊ थर रचण्यात अपयश आलं...

ठाणे : सोमवारी मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा मोठा जल्लोष पाहायला मिळालाय. ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावतीनं सोमवारी सायंकाळी 'प्रो गोविंदा 2018'चं आयोजन करण्यात आलं होतं. या खेळात एकूण 15 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी, बहुचर्चित अशा 'जय जवान' गोविंदा पथकानं नऊ थर लावण्याचा प्रयत्न केला... परंतु, हा प्रयत्न फसला... आणि या गोविंदा पथकातला एक गोविंदा नवव्या थरावरून खाली कोसळला... सुदैवानं, या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त नाही... पण, हा क्षण मात्र उपस्थितांच्या अंगावर काटा उभा करणारा ठरला. 

'प्रो गोविंदा 2018'नं रात्री 9.30 च्या सुमारास जोगेश्वरीच्या 'जय जवान' गोविंदा पथकानं नऊ थरांचा मानवी मनोरा रचण्याचा प्रयत्न केला. याआधी, सोमवारी दुपारी याच पथकातील गोविंदांनी ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नऊ थर रचत दहीहंडी फोडली. तसंच याच पथकानं ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित करण्यात आलेली २१ लाख रुपयांची दहीहंडी फोडली होती. त्यामुळे, रात्रीही या पथकाच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष लागून होतं. पण, 'जय जवान'नं दोनदा प्रयत्न करूनही त्यांना नऊ थर रचण्यात अपयश आलं... दुसऱ्यांदा शेवटचा थर रचत असताना उंचावरून हा मानवी मनोरा धाडधाड कोसळला... आणि बघणाऱ्यांचा थरकाप उडाला. 

'प्रो गोविंदा 2018' या स्पर्धेत वडाळ्याच्या अष्टविनायक मंडळानं बाजी मारत केवळ 59 सेकंदांत आठ थरांचा मानवी मनोरा रचला आणि प्रथक क्रमांक पटकावला... तर बालवीर गोविंदा पथक (1.08 मिनिटे), कोकण नगर (1.03 मिनिटे) आणि बोरिवलीच्या शिवसाई गोविंदा पथक (1.17 मिनिटे) या तिघांनीही आठ तर रचून अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांचं बक्षीस मिळवलं.