VIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल

शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला.   

Updated: Nov 2, 2020, 07:53 PM IST
VIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल  title=

मुंबई : कोरोना काळात मास्कचा वापर करणं, सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिक डिस्टन्सिंग पाळणं या साऱ्या आवश्यक नियमांचं सर्वांनीच काटेकोरपणे पालन करण्यास प्राधान्य दिलं. पण, असं असतानाही अनावधानानं किंवा मग आणखी कोणत्या कारणानं अनेकदा या काही मार्गांनी या नियमांचं पालन केलं जात नाही आहे. किंबहुना याच मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरणातही टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सोशल मीडियावर यासंबंधीचाच एक व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं. महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यातील हा व्हिडिओ असून, त्यांच्यासोबत या बैठकीमध्ये शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी राऊत यांना शिंक येताच त्यांनी तोंडावर लावलेला मास्क काढला आणि ते शिंकले. त्यांनी तोंडापुढे हात धरला. हाच व्हिडिओ राणेंनी पोस्ट करत, 'जरा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे, देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव' असं लिहिलं. 

 

सोशल मीडियावर नितेश राणे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर लगेचच व्यक्त होत त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात एका व्हिडिओवरुन बऱ्याच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही.