व्हिडिओ : विश्वास नांगरे पाटील यांची 'सायकल वारी'

वारीच्या  काळात सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील स्वत: रस्त्यावर उतरले... ते देखील सायकलवर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 1, 2017, 11:45 AM IST
व्हिडिओ : विश्वास नांगरे पाटील यांची 'सायकल वारी' title=

मुंबई : वारीच्या  काळात सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील स्वत: रस्त्यावर उतरले... ते देखील सायकलवर...

आळंदी ते पंढरपूर अशी 'सायकल वारी' त्यांनी केलीय. तीन जिल्ह्यांतलं अंतर मोठं असल्यानं आणि एसी गाडीत बसून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवणं कठिण असल्यानं त्यांनी सायकल हे वाहन निवडलंय. 

२००७ साली एसपी पदावर कार्यरत असताना त्यांनी १०० किलोमीटर पायी वारीही केली होती. त्यामुळे वारकऱ्यांना काय अपेक्षित असतं याची कल्पना होती. स्वच्छता आणि सुरक्षा याचा संदेश आणि पाहणी करत काही स्वयंसेवकांसह नांगरे पाटील यांनी ही 'सायकल वारी' केलीय. 

त्यांच्या याच वारीचा एक व्हिडिओ चेतन लोखंडे यांनी सोशल मीडियावरून शेअर केलाय.