अलिबाग : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार उभा केल्याने भाजपने शिवसेनेला धडा शिकविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मदत न करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच या निवडणुकीत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही शिवसेनेविरोधात दंड धोपटले आहेत. त्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला जोरदार शह देण्यासाठी भाजपने विरोधकांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना भाजपमध्ये बिनसले आहे. त्यामुळे भाजपचा शिवसेनेला पाठिंबा दिलेला नाही. भाजप आता राष्ट्रवादीला मदत करणार असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजपचे सर्व मतदार अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. भाजपने हा निर्णय घेणामागे पालघर पोटसभा निवडणूक आहे. पालघर निवडणुकीत भाजपला शिवसेनेचा फटका बसणार आहे.
शिवसेनेने आपला उमेदवार दिल्याने भाजपसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावीत फोडत त्यांना थेट भाजपची उमेवारी दिली. दरम्यान, शिवसेनेने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी भाजपने प्रयत्न केले. मात्र, शिवसेना ठाम राहिल्याने आता त्यांना धडा शिकविण्यासाठी भाजपने नवी खेळी केलेय. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदार अनिकेत तटकरे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.