औरंगाबाद : औरंगाबादेत एक सिंचन प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडलाय. जवळपास ९० टक्के काम होऊनही उर्वरित काम होत नसल्याने गावक-यांनी प्रकल्पावरच आंदोलन सुरु केलय.
कौटगावचा हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावातील गावकरी आंदोलनाला बसले आहेत. ११७ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यासाठी २००१ मध्ये जमीन अधिग्रहण आणि कामाला सुरुवात झाली. मात्र ११७ पैकी १० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण रखडल्याने प्रकल्पाचे काम रखडले. न्यायालयीन लढाईत २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि कामाला हिरवा कंदील मिळाला.
मात्र, सरकारी अनास्थेमुळे काम पुन्हा थांबले. त्यामुळे काम चालू व्हाव यासाठी गावकरी प्रकल्पाच्या भींतींवर बसून आंदोलन करताय. हा प्रकल्प पूर्ण झाला तर आठ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे इतकच नाही तर गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. हजारो हेक्टर जमीन सुपीक झाल्याने शेतकऱ्यांची शेती चांगली होईल, असा विश्वास शेतक-यांना आहे मात्र हा प्रकल्प पूर्ण होणार कधी असा प्रश्न आहे.