Vinayak Mete Death : घात की अपघात? विनायक मेटे यांचा मृत्यू नेमका कशामुळे?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे मुंबईकडे येत असताना अपघाती निधन झालं. या निधनानंतर मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनांनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात, मेटेंचं निधन यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विनायक मेटे यांच्या गाडीचा खरंच अपघात झालेला की यामागे घातपात होता याबाबत तपासलं जाईल, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जाणून घेऊयात मेटेंच्या अपघाती निधनाबाबत उमटलेल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया. 

Updated: Aug 14, 2022, 01:22 PM IST
Vinayak Mete Death : घात की अपघात? विनायक मेटे यांचा मृत्यू नेमका कशामुळे? title=

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे मुंबईकडे येत असताना अपघाती निधन झालं. या निधनानंतर मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनांनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात, मेटेंचं निधन यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विनायक मेटे यांच्या गाडीचा खरंच अपघात झालेला की यामागे घातपात होता याबाबत तपासलं जाईल, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जाणून घेऊयात मेटेंच्या अपघाती निधनाबाबत उमटलेल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया. 

विनोद पाटील - Vinod Patil On Vinayak Mete Death -

"विनायक मेटे चळवळीत काम करणारा सच्चा लढवय्या नेता होता. मागील पंधरा वीस वर्ष मेटेंचा मराठा समाजाच्या चळवळीत सहभाग होता, मोठं योगदान होतं. विनायक मेटे गेलेत या बातमीवर विश्वास बसत नाही."

पंकजा मुंडे - Pankaja Munde on Vinayak Mete Death -

"विनायक मेटे यांचं जाणं हा महाराष्ट्रासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत मोठा धक्का आहे. कसलाही पारिवारिक वारसा नसताना, स्वतःच्या जीवावर, संघटन कौशल्य आणि वाक् चातुर्याच्या जोरावर त्यांनी व्हिजन घेऊन विनायक मेटे यांनी काम केलं.  येत्या आठवड्यात त्यांची आणि माझी भेट ठरलेली. विनायक मेटे यांच्या जाण्यानं मला जो धक्का बसलाय त्यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत."

सुप्रिया सुळे - Supriya Sule on Vinayak Mete Death -

"मी विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करतेय यावर माझा विश्वास बसत नाही. अपघातात विनायक मेटे गेल्यावर आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही बातमी होती. मेटेंशी आमचे राजकीय मतभेद होते पण आमच्या नात्यातील ओलावा कधीही कमी झाला नाही."

देवेंद्र फडणवीस - DCM Devendra Fadnavis on Vinayak Mete Death -

आजचा दिवस दुःखद घटनेने सुरु झाला. साधारण हेड इंज्युरीने त्यांचं निधन झालं हे समजलं. आता मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. विनायक मेटे हे संघर्षशील नेतृत्त्व होतं. अतिशय गरिबीतून वर येऊन स्वतःच्या भरवशावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं. मराठा आरक्षणासंदर्भात मेटेंचा प्रचंड अभ्यास होता. गेल्या आठ ते दहा वर्षात आम्ही जवळून काम केलेलं. काल रात्री  2.15 वाजता मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला येतोय असा त्यांनी मला मेसेज केलेला. सकाळी तुमच्याशी बोलतो, असंही ते म्हणाले. विनायक मेटे यांचं जाणं त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि शिवसंग्राम परिवारासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.   

एकनाथ शिंदे - CM Eknath Shinde on Vinayak Mete Death -

सकाळी मला विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत समजलं. विनायक मेटे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता होता. त्यांच्याशी बोलताना त्यांची मराठा समाजाविषयीची तळमळ कायम जाणवायची. आज आमची मराठा समाजाच्या मागण्यांसाठी महत्त्वाची बैठक होती.शासन त्यांच्या परिवारासोबत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देव त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद द्यावी. या अपघाताबाबत सर्व बाबी तपासल्या जातील.

आबा पाटील - Aaba Patil on Vinayak Mete Death -

हायवेला ज्यावेळी अपघात झाला तेंव्हा तब्बल दोन तास रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा त्यावेळी मिळाली नाही. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? याची आम्हाला शंका आहे. आबा पाटील नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ. 

vinayak mete, vinayak mete death, comments on vinayak mete death, vinayak mete accident or assassination, vinayak mete family reaction on death

vinayak mete death accident or assassination conspiracy serious question raised by aaba patil