Pune Crime : पुण्यातील ओशो आश्रमात धक्काबुक्की, 100 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime : ओशो आश्रमात बेकायदेशीर घुसून धक्काबुक्की केल्याप्रकरणी 100 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो आश्रमाच्या ट्रस्टबाबत सध्या अनेक वादविवाद सुरु आहे. दरम्यान, आश्रम विक्रीच्या वृत्तानंतर मोर्चा काढण्यात आला आणि गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला.

Updated: Mar 23, 2023, 12:40 PM IST
Pune Crime : पुण्यातील ओशो आश्रमात धक्काबुक्की, 100 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime : पुण्यातील ओशो आश्रमात बेकायदेशीर घुसून धक्काबुक्की केल्याप्रकरणी 100 जणांवर कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो आश्रमाच्या ट्रस्टबाबत सध्या अनेक वादविवाद सुरु आहे. (Osho Ashram in Pune) आश्रमची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर ओशो आश्रमाचे अनुयायी आणि वैभव कुमार पाठक यानी विरोध करण्यासाठी आश्रमावर मोर्चा काढला होता. काल या मोर्चेदरम्यान आश्रमात बसून बेकायदेशीररित्या ट्रस्टच्या ट्रस्टीना मारहाण केल्याप्रकरणी वैभव कुमार पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल आश्रमावर काढण्यात आलेल्या मोर्च्याच्यावेळी  पोलिसांनी लाठीमार केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता. 

पुण्यातील ओशो आश्रमात भक्तांचा गोंधळ, गेट तोडून आत केला प्रवेश; पोलिसांचा लाठीचार्ज

काल पुण्यातील ओशो आश्रमात ( Osho Ashram) भक्तांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे  वातावरण होते. कोरेगावर परिसरात आचार्य रजनीस तथा ओशो यांचे यांचे भक्त आश्रमाचे गेट तोडून घुसल्याने मोठा गोंधळ उडाला. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी यावेळी भक्तांवर लाठीमार केला होता. यावेळी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 

ओशो आश्रमात गोंधळ सुरु झाल्याने नेमकं काय झालं, याची चर्चा सुरु झाली. नेमका काय वाद याची चर्चा होती. दरम्यान, ओशो आश्रम विक्रीला काढल्याची अफवा पसरली आणि हा गोंधळ उडाला. त्यानंतर राडा पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा नवीन चर्चा आहे. 'संभोग से समाधि की ओर'...  या पुस्तकामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की ओशोंच्या आश्रमात नेमकं चालायचं काय?

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने ओशो भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखले. यामुळे ओशो भक्तांनी पुण्यात आंदोलन केले.  पुण्यातील ओशो आश्रमात  तणाव निर्माण झाला होता. गेट तोडून भक्तांनी आश्रमात प्रवेश. ओशो भक्तांवर पोलिसांनी लाठीमार देखील केला. या सगळ्या घडामोडींमुळे ओशो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'संभोग से समाधि की ओर'... 

70 च्या दशकातील सुपरस्टार विनोद खन्ना यांनी गुरु ओशोला शरण जाऊन सर्वांना चकित केले होते. यानंचर त्यांचा मुलगा साक्षी खन्ना याने देखील आपल्या वडिलांच्या पाउलावर पाउल ठेवले. दरम्यान, ओशो रजनीश यांचे मृत्यूपत्र देखील चर्चेत आले. ओशो यांचे बानावट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टने कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप ओशो यांचे निकटवर्तीय आणि याचिकाकर्ता योगेश ठक्कर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.