शेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड

शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या. 

Updated: Jun 5, 2017, 12:12 PM IST
शेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड title=

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या. 

यात कळंब तालुक्यात मोहा आणि मस्सा येथे ३ तर लोह-यामध्ये २ बसेसची तोडफोड करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी परीसरातील संतप्त शेतकऱ्यांनी समुद्रवाणी तांडा  रस्त्यावर जाळपोळ करून आणि अर्धनग्न आंदोलन करत रस्ता रोको केला. त्यामुळे उस्मानाबाद-औसा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. तालुका पातळीवरील शहरांपेक्षा ग्रामीण भागात आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे.

नागपूर - शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आंदोलन दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर फेकले.जय जवान-जय किसान संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या दिघोरी चौकात आंदोलन हे आंदोलन करण्यात आले.

मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुकमधील शेतकरी कर्जमाफीसाठी  गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढलेत आणि शोले स्टाइल आंदोलन केले.

सर्व पक्षीय आंदोलकांनी सांगलीतील जी दुकाने सुरू होती ती बंद केली. सांगली शहरात मोटारसायकल रॅली काढून दुकाने  बंद केली. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, परवानगी नाकारल्या नंतर ही, आंदोलकांनी रॅली काढली 

झी २४ तास LIVE अपडेट

11:20 AM
नंदूरबार : शिवसेनेच्यावतीने धुळे नंदूरबार रोडवर रनाळे गावाजवळ दोन तासापासून रस्ता रोको, आंदोलनामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा
11:02 AM
उस्मानाबाद  : महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोहारा येथे शेतकऱ्यांनी बसच्या काचा फोडल्या, लोहारा-उमरगा बसचे केले नुकसान
11:00 AM
रत्नागिरी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये शिवसेना आक्रमक, लांज्यातील बाजारपेठ शिवसैनिकांनी जबरदस्तीने  बंद, राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा पुढाकार,, आमदार उतरले रस्त्यावर, शिवसैनिकांसोबत केली बाजारपेठ बंद, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर
10:59 AM
लातूर : शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी लातूर-बार्शी राज्य महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, बोरगाव काळे येथे गेल्या अर्ध्या तासापासून रास्ता रोको सुरु, रास्ता रोकोत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश, महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा.
10:57 AM
सांगली :  शेतकरी आंदोलनासाठी सांगली बंद आंदोलन, सर्व पक्षीय मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली,  शासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप, मोर्चा काढणारच असल्याचा सर्व पक्षीय नेत्यांची भूमिका 
10:57 AM
अकोला : जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, अकोट - येथे आज बंदचा कोणताही पडसाद नाही, बाळापूर - येथे कृषी सेवा केंद्र वगळता बाजारपेठ सुरु, मूर्तिजापूर - येथे बंदला संमिश्र प्रतिसाद, पातूर - येथे बंदचा कोणताही परिणाम नाही, तेल्हारा - येथे १०० बंद, तर अकोला शहरात भाजी
08:40 AM   
नांदगाव : तालुक्यातील न्यायडोंगरी, सटाना  तालुक्यातील  नामपूर येथील आठवडा बाजार शेतकऱ्यांनी  ठेवले बंद, व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग, बाजारात शुकशुकाट
08:38 AM   
नाशिक : येवला शहरात कडकडीत बंद , धामणगाव येथे शेतकऱ्यांकडून रस्त्यावर वांगे , कांदे , दूध फेकून शासनाचा निषेध 
08:38 AM   
अकोला : शेतकरी संप आणि महाराष्ट्र बंदला प्रतिसाद, मुख्य भाजी बाजारपेठ बंद 
08:38 AM   
नाशिक : महाराष्ट्र बंदला  सर्वत्र  उत्स्फूर्त प्रतिसाद, मनमाड,नांदगांव ,मालेगाव, कळवण, सटाना ,देवाळा  बाजार समिती व्यवहार ठप्प, येवला शहरात कडकडीत बंद , धामणगाव येथे 
शेतकऱ्यांकडून रस्त्यावर वांगे , कांदे , दूध फेकून केला शासनाचा निषेध 
08:14 AM   
कोल्हापूर : शेतकरी संपानंतर आता महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अनेक दुकान बंद
07:15 AM   
नाशिक : आज राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी राज्य बंदची हाक, राज्यात एकही शेतमाल वाहन फिरु देणार नाही, नाशिकच्या बैठकीत ठराव 
07:07 AM   
मुंबई : शेतक-यांचा संप सुरु झाल्यानं मुंबईत भाज्यांची टंचाई, यावर उपाय म्हणून भाजपनं सुरु केले लालबागमध्ये आठवडा भाजीमार्केट , या भाजीमार्केटला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद