शेतकरी आंदोलन पेटणार, पोलिसांचा लाठीचार्ज तर साताऱ्यात दगडफेक

 नांदगाव - चाळीसगांव रास्त्यावर जळगाव खुर्द येथे  शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या  शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी संपप्त झालेत. पोलिसांच्या निषेधार्थ  शेतकऱ्यांनी  रास्ता रोको  सुरु केला. याचे पडसात परिसरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.  

Updated: Jun 5, 2017, 10:43 AM IST
शेतकरी आंदोलन पेटणार, पोलिसांचा लाठीचार्ज तर साताऱ्यात दगडफेक  title=

जळगाव, नाशिक, सांगली, सातारा :  नांदगाव - चाळीसगांव रास्त्यावर जळगाव खुर्द येथे  शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या  शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी संपप्त झालेत. पोलिसांच्या निषेधार्थ  शेतकऱ्यांनी  रास्ता रोको  सुरु केला. याचे पडसात परिसरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.  

                

दरम्यान, सातार येथे  शेतकऱ्यांच्या सुरु असणाऱ्या संपात दुधाच्या दोन टॅंकरवर दगडफेक करण्यात आलेय. ही घटना पाटखळमाथा परिसरातील येथे घडली. टॅंकरच्या काचेवर दगडफेक झाली. दोन्ही टॅंकर राष्ट्रवादीचे नेते किरण साबळे-पाटील यांचे  आहेत. दगडफेकीनंतर पोलिसां देखत कार्यकर्ते पसार झालेत.  

 

तर सांगलीत अमनापूर आणि मनेराजुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलेय.   तर मनेराजुरी येथे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुतळा जाळला आणि दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.  संपूर्ण गाव बंद पाळण्यात आलाय.

राज्यव्यापी बंदला उस्फूर्त प्रतिसाद

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून हिंगोलीसह वसमत कळमनुरी औंढा नागनाथ सेनगाव,जवळा बाजार,आखाडा बाळापूर येथील भाजी मार्केट मध्ये कडकडीत बंद, हिंगोली मध्ये काही बागवानांनी भाज्या आणल्या होत्या तेथील भाजा आंदोलकांनी रस्त्यावर फेकून देऊन आंदोलन केले.

पुण्यातही शेतकऱ्यांच्या बंदला मोठा प्रतिसाद

बालसोंड येथे रास्ता रोको करून एकास दुधाने आंघोळ घातली. तर कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथे ही शेतकर्यांनी हिंगोली नांदेड राज्यमहामार्ग अडवून भल्या पहाटे पासून दोन तास रस्ता अडवण्यात आला होता. 

कळमनुरी येथील बाजार पेठेत ही आज भाजीपाला आलाच नाही,वसमत येथे तर शेकडो शेतकऱ्यांनी व्यापार्यानी बैठक घेऊन शहर बंद ठेवण्याच कालच जाहीर केलं होत,यात विरोधी पक्षाचे नेतेआणि कार्यकर्ते ही सहभागी झाले होते.

पुण्यात बंद

पुण्यातही शेतक-यांच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मार्केट यार्डमध्ये शेतमालाची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. फक्त तीस टक्के शेतमाल मार्केट यार्डात आला आहे. शेतकरी संपानंतर चौथ्या दिवशी भाजीपाल्याची आवक कमी होती. आज बंदाच्य़ा पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.