ओ शेठ... या शेतकऱ्यानं नादच केलाय थेट! जावयासाठी शेतकऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर, पाहा व्हिडीओ

केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरदेवाला लग्नमंडपात नेण्यासाठी एका शेतकऱ्यांने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं.

Updated: Jan 14, 2022, 08:32 PM IST
ओ शेठ... या शेतकऱ्यानं नादच केलाय थेट! जावयासाठी शेतकऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर, पाहा व्हिडीओ title=

नाशिक (योगेश खरे) : शेतकऱ्याला कुणी सहजासहजी मुलगी देत नाही, त्याच्याकडे उपेक्षेनं पाहिलं जातं. तसेच शेतकऱ्याच्या मुलीला देखील लोकं आपल्या घरी सहजासहजी आणत नाहीत आणि हे कटु सत्य आहे. मात्र शेतकऱ्यानं मनात आणलं तर तो काही की करू शकतो, हे आज गोपीनाथ बोडकेंनी दाखवून दिलं आहे. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू-वर दोघेही हेलिकॉप्टरमधून जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की, यात इतकं विशेष काय, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्हीही मुलं शेतकऱ्यांची आहेत आणि शेतकऱ्याच्या मुलांचा हा थाट सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरदेवाला लग्नमंडपात नेण्यासाठी एका शेतकऱ्यांने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं. आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नात आपल्या जावयाला आणण्यासाठी दहा किलोमीटर अंतराचे भाडे त्याने एव्हिएशन कंपनीला दिले. त्यामुळे नेहमीच उपेक्षेने बघितला जाणारा शेतकरी जिद्दी आणि श्रीमंत असू शकतो हा नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

या हेलिकॉप्टर मध्ये बसलेली वर वधू ची जोडी संकेत आणि वैष्णवी आहे.  दोघेही शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि दोघेही इंजिनीअर आहेत. गोपीनाथ बोडके यांची वैष्णवी एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी आपल्या जावयाला अनोखी भेट दिली ती म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये स्वारी करण्याची. 

या दोघांचं लग्न गेल्या महिन्यात नाशिकमध्ये थाटामाटात पार पडलं, इंजिनीअर असला तरी संकेत शेतामध्ये काम करतो.

नाशिक जिल्ह्यातला शेतकरी हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी फळबागा पिकांसाठी कृषी संशोधनामध्ये मार्गदर्शक ठरला आहे. शेतकरी आपल्या मेहनतीने काहीही साध्य करू शकतो या घटनेने दाखवून दिलं आहे.