व्हिडिओ : पाणीप्रश्नावर मराठवाड्याच्या भावड्याची 'बिल्याट' स्टॅन्ड अप कॉमेडी

शिवाय मुंबईत मराठी टक्का वाढवायचाय तर त्यासाठी एक युक्तीही श्रावण सांगतोय...

मुंबई : मराठवाडा, पाणी आणि राजकारण... हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा मुद्दा राहिलाय. पण हाच गंभीर विषय एका भावड्यानं अतिशय नेमक्या पद्धतीनं मांडलाय... पण गंभीर चेहऱ्यानं नाही तर हसत्या-खेळत्या पद्धतीनं परंतु, तेही मार्मिकपणे... या भावड्याचं नाव आहे श्रावण नळगीरकर

पुणे, औरंगाबादमध्ये भैय्या लोक नाहीत याचं कारणंही श्रावणणं आपल्या पद्धतीनं सांगितलंय... शिवाय मुंबईत मराठी टक्का वाढवायचाय तर त्यासाठी एक युक्तीही श्रावण सांगतोय... 

असा हा बारा जिल्ह्याचं पाणी पिणाऱ्या श्रावणनं सांगली ते लातूर पाणी ट्रेननंच का नेलं? याचंही उत्तर श्रावण देतोय... शिवाय मुंबईत जेव्हा टोल बंद करण्यासाठी मनसेनं आंदोलन छेडलं होतं, तेव्हाच औरंगाबादमध्येही एक आंदोलन सुरू होतं... ते काय होतं? आणि कशासाठी? हेही या भावड्यानं अगदी चपखलपणे सांगितलंय... 

भाडीपा अर्थात 'भारतीय डिजिटल पार्टी' या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय. सोशल मीडियावरही हा हसता हसतानाच मराठवाड्याची व्यथा सांगणारा हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.