मुंबई : सतत उपेक्षित असलेल्या वडार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मागणी बाबत सकारात्मक विचार न झाल्यास आक्रमक भूमिका घेऊ. मात्र आरक्षण घेऊनच स्वस्थ बसू असा निर्धार वडार समाज मेळाव्यात वडार नेते विजय चौगुले यांनी व्यक्त केला. यवतमाळमध्ये वडार समाजाचा विदर्भस्तरीय मेळावा पार पडला.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली तरी दगड फोडून देवाची मूर्ती बनविणारा वडार समाज हा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या अद्यापही मागासलेला आहे. करिता अनेक आंदोलने, निषेध मोर्चे, उपोषण आणि राज्यकर्त्यांसोबत बैठका झाल्या. तरीही शासनाकडून वडार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
राज्यात मराठा आंदोलन पेटले असतांनाच आता मुस्लीम आरक्षणासाठी मुस्लीम समाज ही आंदोलनाच्या भूमिकेत आहे. औरंगाबादेत घेण्यात आलेल्या बैठकीत मुस्लीम आणि राजकीय संघटना उपस्थित होत्या. तसेच राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय.. त्यामुळं धनगर समाजानं या लढ्याला तीव्र स्वरूप द्यायला सुरुवात केलीय.