सांगली : सांगलीच्या चांदोली परिसरातलं वारणा धरण ९६.९० टक्के भरलंय. धरणातून ४ हजार ३७७ क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. त्यामुळं वारणा दुथडी भरुन वाहतेय. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.
धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.२५ मीटरनं उचललेत. दरवाजातून ३ हजार ५९५ आणि वीजनिर्मिती केंद्रातून ७८२ असा एकूण ४३७७ क्युसेक विसर्ग वारणेत सुरू आहे. नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असा इशारा देण्यात आलाय.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुर आहे. मध्यंतरी आठ ते दहा दिवस पावसानं उघडीप दिली होती. त्यामुळे भात पिके जोमात आली आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली.