राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. हा पाऊस राज्यात सर्वदूर पसरणार असून तो मुसळधार पडण्याचा इशाराभारतीय हवामान विभागाने दिला आहे. 

Updated: Sep 22, 2021, 07:11 AM IST
राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा title=
संग्रहित छाया

मुंबई : Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. हा पाऊस राज्यात सर्वदूर पसरणार असून तो मुसळधार पडण्याचा इशाराभारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत राज्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain in Maharashtra)

पुढील 48 तास महत्वाचे आहे. राज्यात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज राज्यात कमी अधिक पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच भारतात पाऊस सक्रीय होईल, असेही सांगण्यात आले आहे. पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हा पाऊस होणार आहे.