स्पर्धा परीक्षेत अपयश, पण तो खचला नाही...! गावी गेला अन् शेतीतून घेतलं लाखोंचं उत्पन्न

Hanuman Bhoyar sucess story : आयुष्यातील कमवती 10 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा घरी पुन्हा मोकळ्या हाताने जावा लागतं, तेव्हा नाकार्तेपणाची भावना जगणं तरुणांसाठी खूप अवघड असतं. मात्र, एका तरुणाने शेतीच्या माध्यमातून स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 26, 2024, 03:45 PM IST
स्पर्धा परीक्षेत अपयश, पण तो खचला नाही...! गावी गेला अन् शेतीतून घेतलं लाखोंचं उत्पन्न title=
Washim Stundent sucess story

Washim Stundent sucess story : वाशिमच्या कानडी येथील हनुमान भोयर या तरुणाने उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता आपल्या शिक्षणाचा शेतीसाठी उपयोग करुन एक एकर शेतात कोथिंबीरची लागवड केली. याच शेतीतून लाखोचे भरघोस उत्पन्न घेत शेती पिकवून आपण चांगले उत्पन्न घेऊन शकतो असा संदेश युवकाने दिला आहे. स्पर्धा परीक्षेत यश न आल्याने अनेक तरुण नैराश्याच्या आहारी जातात परंतू हनुमान भोयार याने आपली पारंपारित शेती सुरू ठेवली अन् लोखोंचं उत्पन्न घेतलंय.

हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेक जण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. तर काही उच्च शिक्षित तरुण आपल्या गावाकडे नोकरी न करता शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहेत. 

उन्हाळ्यात बाजारात कोथिंबीरची आवक घटलेली असते. त्यामुळे कोथिंबीरला चांगले दर मिळत असल्याने भोयर यांना चांगले उत्पन्न मिळालं आहे. वाशिममध्ये अशाच एका तरुणाने उच्च शिक्षणाचा लाभ कुणाच्या ताबेदारीसाठी नव्हे तर स्वतःच्या शेतीसाठी म्हणत आपलं कर्तव्य कामातून करून दाखवलं आहे. 

आधीच ग्रामीण भागात बेरोजगारीचा कल हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. यामुळे तरुणांमध्ये नैराश्यच वातावरण निर्माण होत आहे. शासकीय पद भरतीसाठी अभ्यास मेहनत करुन अर्ज करून पाठपुरावा केला जातो. मात्र नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. यावर मात करीत काही उच्चशिक्षित तरुण हे आपल्या शेतीकडे वळल्याने स्वतःचा मार्ग निवडत लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. कानडी येथील हनुमान भोयर या उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुणाने नोकरीच्या मागे न पडता आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीकडे वळून स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. यातून इतरांना कसा रोजगार मिळवून देता येईल, या उद्देशाने हा तरुण सध्या शेतीत काम करीत असल्याचं त्यांनी सांगितले.