समाधानकारक पाणीसाठा नसल्याने नाशिक शहरातील पाणीकपात कायम

पाणीपातळीत वाढ झाली नसल्याने निर्णय कायम

Updated: Jul 8, 2019, 07:43 PM IST
समाधानकारक पाणीसाठा नसल्याने नाशिक शहरातील पाणीकपात कायम title=

नाशिक : नाशिकच्या धरणामध्ये समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत नाशिक शहरातील पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये अजून समाधानकारक पाणीपातळीत वाढ झाली नसून येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस आला, तर नाशिकमधील पाणी कपात रद्द करू मात्र अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नसल्याने नाशिक करांवरील पाणी कपात कायम ठेवण्यात आली आहे.

खरंतर एका बाजूला नाशिक शहरांत मुसळधार पाऊस होत असतांना नाशिक शहरात पाणी कपात ही हास्यास्पद बाब असल्याने नाशिक महानगरपालिकेच्या या निर्णयावर टीका देखील होत आहे. दोन दिवसानंतर या निर्णयावर बैठक होणार असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिक मनपा काय निर्णय घेणार हे याकडं सर्वांचच लक्ष लागून आहे.