close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाण्याचा टँकर दरीत कोसळून चालक जखमी, सप्तश्रुंग गडावरील घटना

पाण्याने भरलेला टँकर 200 फूट खोल कोसळून झालेल्या अपघात चालक गंभीर 

Updated: May 19, 2019, 07:30 AM IST
पाण्याचा टँकर दरीत कोसळून चालक जखमी, सप्तश्रुंग गडावरील घटना

निलेश वाघ, झी मीडिया, सप्तश्रुंग गड : पाण्याने भरलेला टँकर 200 फूट खोल कोसळून झालेल्या अपघात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकच्या सप्तश्रुंग गडावरील घाटात घडली. सप्तश्रुंग गडावर सध्या पाणी टंचाई आहे. गडावर लाखो भाविक येत असल्याने पाणी टंचाई तीव्र अधिक आहे. अनेक व्यापारी इतर ठिकाणावरून पाणी टँकरने आणतात.  

आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदुरी गावातून पाणी भरून एक  टँकर गडावर जात असताना भवानी पाझर तलावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंटचे कथडे तोडून टँकर थेट 200 फूट दरीत कोसळला. 

या अपघातात अभिषेक नावाचा चालक गंभीर झाला असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर टँकरचेही  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .