पाण्याची टाकी कोसळून पोकलेनचालक जखमी

दोन दिवसांपासून पाण्याची  टाकी खाजगी ठेकेदाराकडून पाडण्यात येत होती,

Updated: Aug 21, 2018, 02:38 PM IST
पाण्याची टाकी कोसळून पोकलेनचालक जखमी title=

भीवंडी: पाण्याची टाकी कोसळून घडलेल्या अपघातात पोकलेनचालक जखमी झाला. ही घटना भिवंडी भिवंडी रेल्वे स्टेशन येथे शहरातील अंजुरफाटा परिसरात घडली. कोसळलेली टाकी रेल्वेची असल्याचे समजते.

मालगाडीसाठी नवीन रेल्वेरूळ टाकण्यात येणार  होते. त्यामुळे दोन दिवसांपासून पाण्याची  टाकी खाजगी ठेकेदाराकडून पाडण्यात येत होती, आज पोकलनने टाकी पाडत असतांना ९०, हजार लिटर क्षमता असलेली भलीमोठी पाण्याची टाकी पोकलनवर पडली. या घटनेमुळे पोकलेन चालक विजय पवारने पोकलेन मधुन उडी मारली. मात्र तोपर्यंत विजय पाण्याच्या टाकीच्या खाली सापडला आणि गंभीररुपी जखमी झाला.

नागरिकांनी तात्काळ विजयला एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले व पुढील उपचारासाठी विजयला ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे. या घटनेचे पूर्ण चित्रीकरण घटनास्थळी उभा असलेल्या एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.