Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.

Updated: Jan 9, 2023, 08:50 PM IST
Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट! title=
Winter Weather Update

Winter Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (cold wave) पसरल्याचं पहायला मिळतंय. देशाच्या उत्तरेकडील भागात (North India) प्रचंड थंडी जाणवू लागली आहे. (Kashmir) काश्मीरपासून ते अगदी (Madhya Pradesh) मध्यप्रदेशपर्यंत या कडाक्याच्या थंडीचे परिणाम घसरलेल्या तापमानातून दिसत आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी थंडी वाढू शकते, असं संकेत मिळाले होते. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याचा (IMD) इशारा दिला आहे. (weather department warns of cold wave in next 48 hours in maharastras district marathi news)

उत्तरेकडील थंडीचा कहर पहायला मिळत असल्याने दिल्लीत शाळा काही दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अशातच राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळं हुहहुडी चांगलीच वाढलीये. अशातच येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा (Meteorological Department) इशारा देण्यात आला आहे.

पाहा ट्विट - 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी थंडीची लाट ते तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे,जळगाव,नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता आहे. तसेच पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट दाट शक्यता वर्तविण्यात (Maharastra Weather Update) आली आहे.

आणखी वाचा - Nagpur | थंडी वाजते म्हणून शेकोटीजवळ बसल्या, 68 वर्षीय महिलेचा गाऊन पेटला आणि...

दरम्यान, येत्या 48 तासात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भतील काही भागात थंडीची लाट शक्यता (Winter Weather Update) आहे. रात्रीचे किमान तापमान मैदानी प्रदेशात 10 अंशांखाली आणि सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशांपेक्षा कमी झाल्यास ती थंडीची लाट समजली जाते. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांनी आरोग्याची (Health) काळजी घेण्याची गरज आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x