अतीश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : प्रदूषणाच्या समस्येमुळे डोंबिवलीकर(Dombivli) नेहमीच चिंतेत असतात. अशातच डोंबिवलीकरांची चिंता वाढवणारा प्रकार समोर आला. डोंबिवली एमआयडीसी भागातील नाला सफेद झाला आहे.नाल्यातील पाणी सफेद रंगाचे झाले आहे. या प्रकारामुळे इथल्या प्रदूषणाचा(dombivli population) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या पूर्वी डोंबिवलीच्या एमआयडीसी भागातील नाल्याच्या पाण्याला हिरवा, पिवळा रंग आला होता. शिवाय रस्ता देखील गुलाबी झाला होता, त्यामुळे डोंबिवलीकरांना हे काही नवीन नाही.
मात्र, प्रदूषणामुळे डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरतोय. कंपन्यांमधून निघणारी केलीकलची दुर्गंधी, कारखान्यांच्या चिमण्यांमधुन निघणारा प्रदूषणयुक्त धुर यामुळे डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. नवीन सरकार डोंबिवलीतील प्रदुषणाच्या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील डोंबिवलीकर करत आहेत. यामुळे अनेक दुर्घटना देखील घडल्या आहेत.