'कुरिअर' स्फोट : कोण आहेत संजय नहार?

मंगळवारी नगरच्या मारुती कुरिअर कंपनीत झालेल्या कुरिअर स्फोटात तीन जण जखमी झाले..

Updated: Mar 21, 2018, 01:26 PM IST
'कुरिअर' स्फोट : कोण आहेत संजय नहार? title=

अहमदनगर : मंगळवारी नगरच्या मारुती कुरिअर कंपनीत झालेल्या कुरिअर स्फोटात तीन जण जखमी झाले... हे कुरिअर संजय नहार यांच्यासाठी होतं, असं चौकशीत उघड झालंय. 

यानंतर अर्थातच संजय नहार कोण आहेत? त्यांच्यासाठी स्फोटाचं पार्सल कुणी पाठवलं? आणि का पाठवलं? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. 

पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते संजय नहार हे 'सरहद' संस्थेचे संस्थापक आहेत. 'सरहद' ही संघटना काश्मीरमध्ये शांततेसाठी कार्यरत आहे.

संजय नाहर यांच्याविषयी...

- १९९० च्या दशकात पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात

- १९९५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचा संदेश देत सामाजिक कार्य करण्यासाठी 'सरहद' या एनजीओची स्थापना

- राष्ट्रीय एकात्मतेच्या जनजागृतीसाठी १९८४ मध्ये वंदे मातरम या सामाजिक संस्थेची स्थापन

- काश्मीरच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पुण्यातील कात्रजमध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना

कसा झाला स्फोट

मंगळवारी नगरच्या मारुती कुरिअर कंपनीच्या कार्यालयातील एका पार्सलमध्ये हा स्फोट झाला. कंपनीचे कर्मचारी रात्री दहाच्या सुमारात एक पार्सल सोडत होते त्यावेळी अचानक हा स्फोट झाला. या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले.