दीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील गूढ उकललं?

जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 11, 2018, 10:08 AM IST
दीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील गूढ उकललं? title=

पुणे : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची हत्या त्यांच्याकडच्या केअरटेकरनंच केल्याचं उघड झालं आहे.  जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. 

घटनेच्या वेळी दिलीप कोल्हटकर घरातच होते

पुण्यातल्या एरंडवणे परिसरातल्या मैथिली इमारतीत त्यांचं घर आहे. घटना घडली त्यावेळी त्यांचे पती दिलीप कोल्हटकर आणि त्यांच्या आई घरामध्येच होत्या. 

किचनमधून धूर येत होता आणि...

दिलीप कोल्हटकर हे आजारी असतात. तर त्यांच्या आई बेडरुममध्ये टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी किचनमधून धूर येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी इमारतीमधील इतर लोकांना आगीची माहिती दिली. तेव्हा स्वयंपाक घरात दिपाली यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला.